आपला जिल्हा

शहरातील विविध विकासकामांसाठी ८८ लाखांचा निधी मंजूर;आ. काळेंनी मानले शासनाचे आभा

 शहरातील विविध विकासकामांसाठी ८८ लाखांचा निधी मंजूर;आ. काळेंनी मानले शासनाचे आभार

शहरातील विविध विकासकामांसाठी ८८ लाखांचा निधी मंजूर;आ. काळेंनी मानले शासनाचे आभा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ नोव्हेंबर २०२६–   कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असतो. या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरात नागरी सुविधा, विरंगुळा केंद्रे आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ७८ लाख आणि मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा-रस्ता अनुदान योजनेंतर्गत १० लाख असा एकूण ८८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

जाहिरात

या ८८ लाखाच्या निधीतून जुने कब्रस्तान ते लाहोटी महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता विकसित करणे १० लाख, अंबिका नगर येथील साईधाम येथे नगरपरिषदेचे विरंगुळा केंद्र उभारणे १२ लाख, हनुमान नगर येथील माऊली मंगल कार्यालयाजवळ इंगळे नगर येथे विरंगुळा केंद्र उभारणे १२ लाख, साई सिटी येथील रचना नक्षत्र समोर येवला रोड येथे विरंगुळा केंद्र उभारणे १२ लाख, सह्याद्री कॉलनी येथे नगरपरिषदेचे विरंगुळा केंद्र उभारणे १२ लाख, गणपती मंदिर येथे सभामंडप बांधणे १० लाख, न्याती मंदिर येथे सभामंडप बांधणे १० लाख, मेसाई माता मंदिर बाजारतळ येथे सभामंडप बांधणे १० लाख निधी देण्यात आला आहे. 

जाहिरात

या निधीमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांना विरंगुळा केंद्रे उपलब्ध होणार असून, दळणवळणाच्या रस्ते विकासासह विविध मंदिरांच्या ठिकाणी भाविक व नागरिकांसाठी सभामंडपाची सोय होणार आहे. त्यामुळे कोपरगावकरांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या विकासकामांसाठी ८८ लाख निधी मंजूर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

आ काळे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे