शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती
kopargaon vijay kapse दि २१ नोव्हेंबर २०२६ : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत शिवसेना संघटनेची बांधणी व पदाधिकारी निवडीच्या प्रक्रिया सुरू झाल्या असून, अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा तालुक्यांतील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती २३ व २४ नोव्हेंबर २०२६ रोजी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांनी दिली आहे.

या मुलाखती शिवसेनेच्या संपर्कप्रमुख शिर्डी लोकसभा खासदार माननीय ज्योतीताई वाघमारे, शिवसेना सचिव मा. श्री. भाऊसाहेब चौधरी व मा. श्री. राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. शिवसेना मुख्य संघटना (फादर बॉडी), शिवसेना महिला आघाडी व युवासेना या तिन्ही संघटनांमधील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद गटप्रमुख व पंचायत समिती गणप्रमुख या पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

मुलाखतींचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता संगमनेर, दुपारी १ वाजता नेवासा व दुपारी ३ वाजता अकोले तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत घेण्यात येणार आहे. तर मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राहाता, दुपारी १ वाजता कोपरगाव व दुपारी ३ वाजता श्रीरामपूर तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे.
या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोलभाऊ खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सागर भैय्या बेग, प्रभाकर काका शिंदे व डॉ. जालिंदर भोर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सर्व इच्छुक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मुलाखतीस उपस्थित राहताना आपल्या सामाजिक, राजकीय व संघटनात्मक कार्याचा सविस्तर अहवाल सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित तालुक्यांसाठी निश्चित केलेल्या वेळेत इच्छुकांनी शासकीय विश्रामगृह, शिर्डी येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांनी केले आहे.




