वारी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न; १२३ रुग्णांची तपासणी
वारी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न; १२३ रुग्णांची तपासणी
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २१ नोव्हेंबर २०२६ : कोपरगावतालुक्यातील राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी हॉस्पिटल,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वारी येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात परिसरातील तब्बल १२३ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीअंती आठ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यापैकी शस्त्रक्रियेची तातडीने गरज असलेल्या दोन रुग्णांना उपचारासाठी तात्काळ नाशिक येथे रवाना करण्यात आले. या दोन्ही रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
जाहिरात
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. शिबिराची सुरुवात राहुल दादा टेके यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व रुग्णांना अल्पोपार देण्यात आला.
टेके पाटील ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत आयोजित करण्यात आलेले हे बारावे नेत्र तपासणी शिबिर होते. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
जाहिरात
शिबिराचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष तथा पत्रकार रोहित टेके यांनी केले. यावेळी दौलत वाईकर,दिनेश निकम, हभप विनायक महाराज टेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार गोरख टेके यांनी मानले. वारी, कान्हेगाव, सडे, शिंगवे परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मिशन फॉर विजन चे वरिष्ठ व्यवस्थापक धनाजी रणपिसे, व्यवस्थापक विशाल गद्रे, एसएमएफजीचे लोकेश सर, चेतन वाघुळदे, संतोष हासे, परसराम मापारी, तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. तोफेल पिंजारी, समन्वयक कैलास भड, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कृष्णप्रिया वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप विनायक टेके महाराज, वारीचे ग्रा.पं.सदस्य दौलत वाईकर, भाजपाचे तालुका सचिव दिनेश निकम, कान्हेगावचे उपसरपंच दीपक चौधरी, सदस्य शरद सांगळे, वारी सेवा संस्थेचे संचालक तान्हाजी थोरमिसे, संचालक मच्छिंद्र टेके, परसराम टेके, अशोकराव टेके, जी.के.टेके, रामेश्वर ठोंबरे, राजेंद्र मुरार, डॉ.ऋषीकेश रासने, डॉ. प्रविण प्रजापती, विलास गोंडे, अशोकराव मलिक, उत्तमराव वाकचौरे, अजीम शेख, स्मिता काबरा, विजया बोराडे, नानी ठोंबरे, खंडू वानखेडे, दिलीपराव गडकरी, वाहेदखान पठाण, रमेश कर्पे, संदीप गायकवाड, सुरज टेके, स्वप्निल टेके, कृष्णा टेके, प्रज्वल टेके, अविनाश दुशिंग, आकाश निळे, आदित्य निळे, शुभम जिरे, संतोष तळेकर, स्वामी निकम, महेश टेके, महेश सिंग, प्रकाश मरळ यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांना पुन्हा दृष्टीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.