आपला जिल्हा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयातून १८ हजार संघटित कामगारांची नोंदणी

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयातून १८ हजार संघटित कामगारांची नोंदणी

विमा व शिष्यवृत्ती च्या माध्यमातून ११ कोटी रुपये वर्ग – संजय कोल्हे: शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यशोधन कटिबद्ध

Sangmner vijay kapse दि २९ नोव्हेंबर २०२६– असंघटित कामगार हे दुर्लक्षित होते. शासनाच्या त्यांच्या करता विविध योजना आहेत. या योजना त्यांना मिळून देण्याकरता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून मोठे काम झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे १८ हजार असंघटित कामगारांची नोंदणी या कार्यालयातून झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना विमा व शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी म्हटले आहे.

जाहिरात

जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या योजना या सर्वसामान्य व्यक्तींसाठी असतात. ती कुणी एका व्यक्तीसाठी नसते. संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत याचबरोबर नागरिकांना शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना म्हणून देण्यासाठी यशोधन मध्ये विविध स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असंघटित कामगारांची नोंदणी मध्ये संगमनेर तालुका अग्रगण्य आहे. यामध्ये यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे १८ हजार कामगारांची नोंदणी केली आहे. गावोगावी या योजनेबाबत जनजागृती करून पात्र व योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले गेले आहे. या माध्यमातून अनेक कुटुंबांमधून आरोग्याच्या व इतर काही समस्या आल्या तरी त्या सोडवल्या जात आहे.

जाहिरात

असंघटित कामगार नोंदणी झाल्यानंतर काही कामगारांचा अकस्मात मृत्यू झाला त्यांना लाभ मिळवून देण्यात व इतर कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यातही यशोधन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून सुमारे ११ कोटी रुपये या कामगारांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत.

मा.महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांचा विकास आणि त्यांच्या तात्काळ प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू असून असंघटित कामगारांना जास्तीत जास्त शासनाचा लाभ मिळावा याकरता यापुढेही अधिक जोमाने काम करू या करता नागरिकांनी यशोधन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे