आपला जिल्हा

आरोग्य संवाद यात्रेत आ.आशुतोष काळेंनी मांडले कोपरगावच्या आरोग्य सुविधांचे प्रश्न तर आरोग्यमंत्र्यांचा मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद

आरोग्य संवाद यात्रेत आ.आशुतोष काळेंनी मांडले कोपरगावच्या आरोग्य सुविधांचे प्रश्न तर आरोग्यमंत्र्यांचा मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद

नवीन इमारती, कर्मचारी निवासस्थाने, प्रसूती कक्ष व उपकेंद्रांसाठी साकडे

Kopargaon vijay kapse दि २९ नोव्हेंबर २०२६ :- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.२९) रोजी पार पडलेल्या आरोग्य संवाद बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. आरोग्यमंत्र्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात

राज्यात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘आरोग्य संवाद यात्रे’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, रुग्ण कल्याण समिती व जन आरोग्य समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत आमदार आशुतोष काळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधांची दुरवस्था, नवीन इमारतींची आवश्यकता, कर्मचारी निवास व्यवस्था, प्रसूती सुविधा आणि नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या मंजुरीसह विविध प्रश्न मांडले.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील धामोरी व रांजणगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या जुन्या व जीर्ण इमारतींच्या जागी नवीन इमारती बांधण्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. सध्याच्या इमारतींची दुरवस्था पाहता आरोग्य अधिकारी, कर्मचारी व उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन बांधकामे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चासनळी येथे अधिकारी-कर्मचारी निवासस्थान व संरक्षक भिंत, माहेगाव देशमुख येथे कर्मचारी निवासस्थान, पोहेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवासस्थान, दहेगाव बोलका आणि वारी येथे कर्मचारी निवासस्थाने, तर टाकळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच ब्राम्हणगाव व गोधेगाव येथील आरोग्य उपकेंद्रांत प्रसूतीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

जाहिरात

कोपरगाव तालुक्याच्या बृहत् आराखड्यानुसार कारवाडी, मोतीनगर, खिर्डी गणेश, सोनेवाडी, नऊचारी, माळवाडी, टाकळी, जेऊर पाटोदा, तिळवणी व माहेगाव देशमुख येथे प्रस्तावित नवीन आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळावी, यासाठीही आ.आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे आग्रह धरला.माहेगाव देशमुख येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदनिर्मिती होऊनही नियमित भरतीऐवजी थर्ड पार्टी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या सेवा सोडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेत सातत्य राखण्यासाठी या केंद्रात नियमित कर्मचारी भरती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार, सुरक्षित प्रसूती सुविधा, सुसज्ज आरोग्य इमारती आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. कोपरगाव मतदारसंघातील आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य संवाद यात्रेच्या व्यासपीठावर केलेल्या मागण्यांना आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळून आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे