आपला जिल्हा

कोपरगावच्या आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

कोपरगावच्या आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी
उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी निधी, ट्रॉमा केअर सेंटरला अंतिम मंजुरी आणि १० आरोग्य उपकेंद्रांचा बृहत आराखड्यात समावेश करण्याची मागणी
Kopargaon vijay kapse दि २९ नोव्हेंबर २०२६-कोपरगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अहिल्यानगर दौऱ्यानिमित्त बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कोपरगाव तालुक्याच्या आरोग्य सुविधांच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांना गती देऊन आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

जाहिरात
यामध्ये कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच कोपरगाव येथे प्रस्तावित ट्रॉमा केअर सेंटरचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्याकडे प्रलंबित असून त्यास तातडीने अंतिम मंजुरी देण्यात यावी, अशी मागणीही आमदार कोल्हे यांनी केली.

जाहिरात
याशिवाय नवीन बृहत आराखड्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील १० आरोग्य उपकेंद्रांचा समावेश करून त्यांना मंजुरी देण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. कोपरगाव तालुक्यासाठी स्वतंत्र महालॅब्स केंद्र सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. सध्या कोपरगावमधील आरोग्य केंद्रांमधून घेतलेल्या नमुन्यांचे तपासणी अहवाल वैजापूर येथे पाठविले जातात. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होऊन रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

जाहिरात
यासंदर्भात यापूर्वीही पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून त्याचा सकारात्मक विचार करून स्वतंत्र महालॅब्स केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आधुनिक, सुसज्ज आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे हा आपला प्राधान्याचा विषय असून, या सर्व मागण्यांवर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा आमदार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे