आपला जिल्हा

लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल कधी करणार?-विरेन बोरावके

लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल कधी करणार?-विरेन बोरावके

लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल कधी करणार?-विरेन बोरावके

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६-कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील शासकीय जागेवरील राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे उतारे मिळून त्यांची शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेला प्रस्ताव पण दिलेला आहे. मात्र याबाबत कोपरगाव नगरपालिका उदासीन असून लक्ष्मीनगर येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल कधी करणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते विरेन बोरावके यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

जाहिरात

कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरासह शहरातील इतर प्रभागातही मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहे. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब सध्या वास्तव्य करीत आहेत त्यांना त्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित होता. नागरिकांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी सातत्याने कोपरगाव नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून वेळोवेळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

जाहिरात

 कोपरगाव शहरात लक्ष्मीनगरसह विविध प्रभागात शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांच्या अडचणीची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगरसह  इतर प्रभागातील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेला दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून, अतिक्रमित जागेची माहिती घेवून हे सर्व प्रस्ताव शासनाच्या विविध विभागाकडे मंजुरीसाठी पाठवीले होते.

जाहिरात

आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून शासनाच्या आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांची. जवळपास सव्वा वर्षापूर्वी मंजुरी मिळाली आहे.या जागा तातडीने नियमाकुल व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी. काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला प्रस्ताव देखील देण्यात आला आहे.मात्र याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे सत्ताधारी काहीसे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या लक्ष्मीनगरसह इतर प्रभागातील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमाकुल करण्यासाठी त्या नागरिकांचा सत्ताधारी किती अंत पाहणार आहे? असा उदिग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते विरेन बोरावके यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

विरेन बोरावके

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे