आपला जिल्हा

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत प्रज्वल ढाकणे ला दोन गोल्ड मेडल

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत प्रज्वल ढाकणे ला दोन गोल्ड मेडल
आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत प्रज्वल ढाकणे ला दोन गोल्ड मेडल
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ मे २०२५–  थायलंड मधील बँकांकमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रँकिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोपरगाव येथील  प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांने २ गोल्ड मेडल मिळवत जगाच्या नकाशावर आपले नाव उमटवत कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

जाहिरात
कोपरगाव शहरातील बेट भागातील रहिवासी असलेला प्रज्वल हा एक उत्कृष्ट योगा खेळाडू असून त्यांनी याआधी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सहभागी होत अनेक बक्षीस मिळवले असून नुकतीच थायलँड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रँकिंग चॅम्पियनशिप मध्ये  ट्रॅडिशनल योगासना इव्हेंट गोल्ड मेडल आर्टिस्टिक सोलो योगासना प्रकारात २ गोल मेडल मिळवले असून बँकॉक श्री पतंजली योगा हेल्थकेअर सेंटरचे  संस्थापक अध्यक्ष बी मोहम्मद जाकेरिया, बँकॉक येथील प्रेमयोग आणि आयुर्वेदा सेंटरचे रंधा नारद, बिटा सेठी, भारतीय आंतरराष्ट्रीय थ्री इयर ऑलम्पिक कमिटीचे आयोजक सेक्रेटरी एम मारिया, गोविंदराज आदिंच्या शुभहस्ते प्रज्वलचा गौरव करण्यात आला.

जाहिरात
 तर प्रज्वलला या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून वायएसडीए इंडियाचे संचालक विद्या हिम्मत यांचे मार्गदर्शन लाभले तर तो नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांचा मुलगा असून त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत  सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे