संगमनेर तालुक्यातील ६४ गावांना लाभ ; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत 78 किमी रस्त्यांसाठी 14 कोटींची मंजुरी

संगमनेर विजय कापसे दि ९ नोव्हेंबर २०२५–महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) मार्फत ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत 78 किलोमीटर रस्त्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तब्बल 64 गावांमध्ये छेद पाणंद रस्त्यांची कामे होणार असून या योजनेसाठी शासनाकडून सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


यामध्ये प्रामुख्याने जवळे कडलग, पिंपळगाव कोंझिरा, राजापूर, आश्वी, रायते, निमगाव भोजापूर, निमोण, नान्नज, कऱ्हे, सुकेवाडी, मालदाड, सायखिंडी, ढोलेवाडी, कासारा दुमाला, मिर्जापुर, चिखली, मंगळापुर, हिवरगाव पावसा, निमगाव खुर्द, धांदरफळ खुर्द, पेमगिरी, माळेगाव, पोखरी हवेली, मेंढवन, गुंजाळवाडी, दरेवाडी, कर्जुले पठार, साकुर, बिरेवाडी, जांबुत, घुलेवाडी, वेल्हाळे, कसारा दुमाला, सांगवी, मिर्झापूर, धांदरफळ बू, मंगळापुर, चिकनी, आभाळवाडी, वडगाव लांडगा, चिंचोली गुरव यांसह इतर गावांचा समावेश आहे.




