संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये लोकशाहीचा जागर कार्यक्रम संपन्न
संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये लोकशाहीचा जागर कार्यक्रम संपन्न
लोकशाहीचा जागर’ म्हणजे भारतीय संविधानाची जागृती- पंडित भारुड
कोपरगाव विजय कापसे दि २१ जुलै २०२४ : कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये लोकशाहीचा जागर कार्यक्रम नुकताच मुख्याध्यापक मोरे आर.एस यांच्या अध्यक्षतेखाली मोठया जल्लोषात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले पंडित भारुड यांनी बोलताना सांगितले की, लोकशाही चा जागर या कार्यक्रमातून भारतीय संविधानाची माहिती मिळते. स्वातंत्र्य समता बंधुता या त्रिसूत्री मुळे सर्वांना समान न्याय, समान हक्क मिळतो. राजा हा राजाच्या पोटी जन्म घेऊन राजा होतो असे नाही, लोकशाहीच्या माध्यमातून गरीब सुद्धा राजा होऊ शकतो, हे भारतीय संविधानाने दाखवून दिलेले आहे. म्हणून गरीब आणि श्रीमंत यांच्या मताचे मूल्य सारखेच आहे. सरकारमध्ये चांगली, सुशिक्षित प्रतिनिधी दिल्याने देशाचा विकास नक्की होतो ,म्हणून मतदारांनी योग्य माणसं विधानसभेत ,लोकसभेत गेल्याने सामान्यांना न्याय मिळतो. घटनेचे राज्य म्हणजे लोकांनी ,लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. लोकशाहीचा व संविधानचा प्रचार व प्रसार शाळेतून केल्यानेच विद्यार्थ्यांमध्ये खरी जाणीव, जबाबदारी व जागृती होईल असे मत भारुड यांनी आपल्या लोकशाहीचा जागर या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक आर. एस .मोरे यांनी देखिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर तसेच लोकशाही पध्दतीने वर्ग प्रतिनिधीच्या निवडी मतदानातून करण्यात आल्या.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे एस. के. यांनी तर आभार शिंदे बी.एम. यांनी केले या प्रसंगी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते.