थोरात कारखान्याच्या वतीने अकलापूर देवस्थानसाठीच्या स्वागत कमानीचे लोकार्पण
काँग्रेस नेते आमदार थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
संगमनेर प्रतिनिधी दि २१ जुलै २०२४- पठार भागासह जुन्नर तालुक्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र अकलापूर देवस्थान साठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचे लोकार्पण काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री.क्षेत्र दत्त देवस्थान अकलापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य कमानीचे लोकार्पण झाले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे, माजी जि.प.सदस्य अजय फटांगरे, सरपंच अरुण वाघ, बबनराव कुराडे, सुहास वाळुंज, संपत आभाळे, गौरव डोंगरे,लहू आभाळे, नवनाथ आहेर, रमेश गपले, अक्षय ढोकरे, बाळासाहेब कुराडे, प्रमोद कुरकुटे, सुरेश कानोरे,सचिन खेमनर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचं पठार भागातील कार्यकर्ते व अकलापूर मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, श्री क्षेत्र दत्त देवस्थान अकलापूर हे पठारभागासह तालुक्याचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. आलेल्या भाविकांची चांगली सोय व्हावी याकरता सातत्याने या देवस्थान करता मोठा निधी उपलब्ध करून दिले असून सुशोभीकरणाचे कामही होत आहे. निसर्ग संपन्न असलेल्या या परिसरात थोरात कारखान्याच्या वतीने भाविकांच्या स्वागताकरता भव्य स्वागत कमानही उभारण्यात आली आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून देवकवठे ते बोटा असा 100 किलोमीटर लांबीचा तालुका आहे .तालुक्याच्या प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या असून सातत्याने काम केल्याने आपला तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे हीच विकासाची परंपरा आपल्या सर्वांनी जपण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात ओळखला जात आहे. सातत्याने विविध कामांसाठी पाठपुरावा आमदार थोरात हे करत असून त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्याला राज्यात ओळख मिळाली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचे जाहीर कीर्तने झाले. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.