बिबट्याच्या हल्ल्यात मंगळापूर येथील संजय वाळे जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात मंगळापूर येथील संजय वाळे जखमी

या घटनेची माहिती मिळताच यशोधन कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली याचबरोबर मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांनी वाळे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर यशोधन मधील विविध कर्मचाऱ्यांनी त्यांना जाऊन धीर दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचारी श्रीमती कोंढार यांनी दवाखान्यामध्ये येऊन चौकशी केली.

संगमनेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने वाढल्या असून बिबट्यांनी अनेक माणसांवर हल्ले केले आहेत यामध्ये अनेकांचा बळीही गेला आहे. जवळे कडलग येथील बालकाच्या मृत्यूनंतर बिबट्यांबाबत ठोस धोरण घ्यावे याकरता आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर प्रांत कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात आले होते.
याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही सातत्याने वनमंत्री व महाराष्ट्र शासनाच्या विभागांना बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत प्रतिबंध करण्याकरता वेळोवेळी सूचना केल्या आहेत.
या हल्ल्यामुळे मंगळापुर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे. विविध ठिकाणी पिंजरे लावावे, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त वाढवावी अशी मागणी मंगळापुर व परिसरातील नागरिकांनी प्रशासन आणि वन विभागाकडे केली आहे.






