आपला जिल्हा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिव्यांग बांधवांनी केला शिव जन्मोत्सव साजरा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिव्यांग बांधवांनी केला शिव जन्मोत्सव साजरा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिव्यांग बांधवांनी केला शिव जन्मोत्सव साजरा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६:- अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशात सुद्धा ज्यांचे आदराने जयघोष करून मानवंदना दिली जाते असे थोर विचारवंत, बुद्धीमान, पराक्रमी, शुरवीर, रयतेचे रक्षक ज्यांनी कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन माँसाहेब जिजाऊंच्या चरणी स्वराज्याची शपथ घेऊन आठरा पगड जातींचे मोठे संघटन उभे करून स्वराज्य निर्माण केले व महिलांना सन्मानाने वावरण्याचे बळ दिले अशा महापुरुषाचा कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहराची आन – बान – शान असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अश्वरुढ पुतळा दिमाखात इतिहासाची साक्ष व भावी पिढीला प्रेरणा देत आहे.

जाहिरात

तालुक्याच्या प्रथम महिला आमदार  स्नेहलता बिपीनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन,  विवेक बिपीनदादा कोल्हे तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अश्वरूढ पुतळ्यास दिव्यांग बांधवांनी पुष्पहार अर्पण करून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

जाहिरात

याप्रसंगी भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे, योगेश गंगवाल, जयवंत मरसाळे, शहराध्यक्ष स्वप्निल कडु, मुक्तार पठाण, गोकुळ मोहने, मुकुल पदे, संजय गीते, दिनेश बोरणारे, रोशन खकाळे, श्याम आहेर, मनोज लकारे, सुनील कोसंदल, किशोर मोहने, दीपक जाधव, अरुण गायकवाड आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच, भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना व भगिनींना शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भरभरून शिवमय शुभेच्छा.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे