आपला जिल्हा

भूमिपूजन मोठ्या थाटात; मात्र दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले- शरदराव थोरात

भूमिपूजन मोठ्या थाटात; मात्र दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले- शरदराव थोरात

देवयानी डेअरी-कांचनवाडी ते कोकमठाण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा; ज्येष्ठ नेते शरदराव थोरात यांची मागणी

Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : कोकमठाण येथील देवयानी डेअरी-कांचनवाडी ते कोकमठाण (ई.जि.मा. ५) या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरदराव थोरात यांनी केली आहे.

जाहिरात

कोकमठाण, संवत्सर, सडे तसेच परिसरातील इतर गावांतील नागरिकांसाठी कोपरगाव शहरात ये-जा करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी आणि वाहनधारक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दररोज प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जाहिरात

सध्या या रस्त्यावर केवळ खडी टाकून ठेवण्यात आली असून, प्रत्यक्ष रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्डे निर्माण होऊन परिस्थिती अधिकच बिकट होते. दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून, शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जाहिरात

महत्त्वाच्या रस्त्याचे मोठ्या थाटात भूमिपूजन करून दोन वर्षांचा कालावधी उलटला, तरी काम पूर्ण होत नसेल तर नागरिकांनी आणखी किती दिवस गैरसोय सहन करायची? असा सवाल उपस्थित होत आहे. विकासकामांचे भूमिपूजन आणि घोषणा करण्यापेक्षा ती कामे प्रत्यक्षात पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या रस्त्याच्या कामाकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून रखडलेले काम सुरू करावे, दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालमर्यादेत रस्त्याचे काम पूर्ण करावे. तसेच कामास विलंब होण्यामागील कारणे स्पष्ट करावीत. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरदराव थोरात यांनी केली आहे.

जाहिरात

भूमिपूजनाचा गाजावाजा झाला, आता प्रत्यक्ष विकासकाम पूर्ण करण्याची वेळ आली आहे. परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करून सुरक्षित, दर्जेदार आणि सुस्थितीतील रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आता तरी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शरदराव थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे