संगमनेर

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील १७५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी कंपन्यांमध्ये थेट निवड

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील १७५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी कंपन्यांमध्ये थेट निवड
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील १७५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी कंपन्यांमध्ये थेट निवड
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि १० मे २०२४विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या उच्च दर्जाचे प्रशिक्षण असणारे इंजिनियर घडविणाऱ्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील १७५ विद्यार्थ्यांची चार ते सात लाखापर्यंत च्या पॅकेजवर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही.बी.धुमाळ यांनी दिली आहे.

या विद्यार्थ्यांच्या निवडीबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य धुमाळ म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी पॉलिटेक्निक हे ग्रामीण भागातील उत्कृष्ट पॉलिटेक्निक ठरले आहे. आयएसओ, एन बी ए सह विविध राष्ट्रीय स्तरावरील अनेक मानांकने या संस्थेने मिळवली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांच्या नोकरीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

जाहिरात

संस्थेमध्ये स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागाच्या वतीने देशातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर टायप करण्यात आलेला आहे. यामुळे अनेक कंपन्या संस्थेमध्ये येऊन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू घेत असतात यावर्षीच्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये. स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया लि. ,किर्लोस्कर ऑइल इंजिन लि., सनी हेवी प्रा. लि., के एस बी पंप लि. ,बी एस ए कार्पोरेशन लि., कमिंस इंडिया लिमिटेड,  हार्मोन इंटरनॅशनल, एल एम टूल्स इंडिया लिमिटेड, प्राईम ग्राफाईट प्रा लि, टेक्नो ग्रुप सॉफ्टवेअर ,सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ,गोल्ड सॉफ्टवेअर पुणे यासारख्या विविध कंपन्यांनी संस्थेमधील मेकॅनिकल, सिव्हील, कॉम्प्युटर ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन , आयटी अशा विविध शाखांमधील १७५ विद्यार्थ्यांची चार ते सात लाखापर्यंतच्या पॅकेजवर थेट नोकरीसाठी निवड केली आहे.

जाहिरात

या कॅम्पस इंटरव्ह्यू  आयोजनासाठी एस एस गंधे, एस पी देशमुख, एम.बी सातपुते, एम.जे.भाबड ,एन.डी नवले ,एस व्ही गायकवाड, प्लेसमेंट ऑफिसर प्रा एस.एम .सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या विविध कंपनीमध्ये थेट निवडीबद्दल लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे बी गुरव, प्राचार्य प्रा विवेक धुमाळ, उपप्राचार्य प्रा.जी.बी.काळे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

अमृतवाहिनी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे