आपला जिल्हा

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६’; कोपरगावकरांच्या कलात्मकतेला मिळणार व्यासपीठ

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६’; कोपरगावकरांच्या कलात्मकतेला मिळणार व्यासपीठ
गौरी-गणपती सजावटीतून दाखवा कल्पकता; प्रथम क्रमांकासाठी ७००१ रुपयांचे बक्षीस
Kopargaon vijay kapse दि १३ सप्टेंबर २०२६ कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गौरी-गणपती उत्सवानिमित्त घरगुती सजावटीतील कलात्मकता, सर्जनशीलता आणि पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दि. १५ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ७००१ रुपये, द्वितीय क्रमांकास ५००१ रुपये, तर तृतीय क्रमांकास ३००१ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य आकर्षक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.

जाहिरात
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या गौरी-गणपती सजावटीचा ६० सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ आणि फोटो आयोजकांकडे पाठवायचा आहे. व्हिडिओ व फोटोसोबत सहभागीचे नाव आणि पत्ता पाठविणे आवश्यक आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो करणे आवश्यक आहे. तसेच सजावटीचा व्हिडिओ पोस्ट करताना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या इन्स्टाग्राम पेजसोबत कोलॅबोरेशन करणे आणि फेसबुक पेजला टॅग करणे बंधनकारक आहे. पोस्टमध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठान हा हॅशटॅग वापरणेही आवश्यक आहे.

जाहिरात
गौरी-गणपती सजावटीच्या माध्यमातून नागरिकांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच पारंपरिक सणाच्या माध्यमातून कलात्मकतेला प्रोत्साहन मिळावे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. कोपरगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कलात्मकता सादर करावी, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे