जीवनात महिलांची भूमिका महत्वाची :- स्वाती कोयटे
एस.जे.एस रुग्णालयात शुक्रवार फी ८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२४ :– कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस.जे.एस रुग्णालयात शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती कोयटे, कोपरगाव लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा ठोळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
समाजात महिलांनी जीवन जगत असतांना आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या स्वतःची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे. आपण निरोगी राहिलो तर आपलं कुटुंब निरोगी राहील असे समजून घेणे महत्त्वाचे आहे. महिला सुशिक्षित होत आहे.त्याचबरोबर महिलांचे घटस्फोटाचे प्रमाण पण वाढत आहे.याला पुरुषच जबाबदार असतो.असे नाही त्याला महिलाही कारणीभूत असतात.आपला कौटुंबिक वाद आपसात एकमेकांना समजून घेतले पाहिजे.जेव्हा दोघे पती पत्नी एकमेकांना समजून आपल्या आयुष्याचा प्रवास करतील तेव्हाच घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल.महिलांच्या जीवनात पुरुषांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे हे आपण विसरले नाही पाहिजे. असे महिलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या स्वाती कोयटे यांनी आपल्या भाषणातून समजावून सांगितले.