एस जे एस हॉस्पिटल ग्रुप कोपरगाव
आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसीला एम.फार्मसी अभ्यासक्रमाची मान्यता
आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसीला एम.फार्मसी अभ्यासक्रमाची मान्यता
कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑक्टोबर २०२४:- कोपरगाव येथील आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसीला एम.फार्मसी अभ्यासक्रमाला तीन प्रमुख शाखांमध्ये फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची फार्मास्युटिक्स, क्वालिटी इन्शुरन्स , आणि फार्माकोलॉजी.या मंजुरीमुळे संस्थेच्या शैक्षणिक विकासात नवा टप्पा गाठला गेला आहे.फार्मास्युटिकल शिक्षण व संशोधनामध्ये संस्थेची भूमिका अधिक दृढ झाली आहे.या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या समावेशामुळे आर. जे. एस. कॉलेजने फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये व्यापक आणि विशेष प्रशिक्षण देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. आरोग्यसेवा आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात कुशल व्यावसायिकांची वाढती मागणी लक्षात घेता, हे नवीन एम.फार्मसी कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांना आकर्षित करतील जे या क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळविण्याचे इच्छुक आहेत.