आर जे एस होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे घवघवीत यश
कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑक्टोबर २०२४:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या वार्षिक परिक्षेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, कोकमठाण येथील विद्यार्थ्यांनी ५९% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले.सी.बी.डी.सी. पध्दतीनुसार विद्यापीठाने एन सी एच् च्या नियमानुसार परिक्षा घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या पध्दतीनुसार कॉलेजचा निकाल ८६ % लागला असुन ८८ पैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १० विद्यार्थी ए टी के टी लागून द्वितीय वर्षात प्रवेश पात्र आहेत.भक्ती आहेर, प्रतिक्षा धोकरट, रिषभ तिवारी हे गुणवत्ता यादीतील पहिले तीन विद्यार्थी आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, विजय कडू, दीपक कोटमे तसेच कॉलेजचे प्राचार्य डाॅ.नितीन राऊत व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.