आर जे एस फार्मसी च्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमास भेट
आर जे एस फार्मसी च्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमास भेट
कोपरगाव विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक औषध निर्माता दिवसाचे औचित्य साधून आपण समाजाचे देणे लागतो व या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात आला , त्या अंतर्गत २३ सप्टेंबर २०२४ रोजी द्वारकामाई वृद्धाश्रम शिर्डी या स्थानिक वृद्धाश्रमाला भेट दिली. आयोजित केलेल्या या भेटीचा उद्देश पिढीतील अंतर भरून काढणे आणि वृद्ध रहिवाशांना सहकार्य प्रदान करणे हा आहे.भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी रहिवाशांशी संवाद साधला, त्यांच्या कथा आणि अनुभव ऐकले आणि त्यांच्या दिवसाला आनंद देण्यासाठी फळ व बिस्कीट वाटप केले त्याचबरोबर मेडिसिन ट्रॉली, नेब्युलायझर , रक्तदाब मापक यंत्र आणि त्यांना नियमित आवश्यक असणारी औषधे विद्यार्थ्याच्या आर्थिक सहकार्यातून देण्यात आली.
या भेटीमध्ये आंतरपिढीतील संबंधांचे महत्त्व आणि ज्येष्ठांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सामाजिक संवादाचा सकारात्मक प्रभाव अधोरेखित झाला.याकार्यक्रमास उपस्थित बेबीताई कातकडे यांनी सांगितले की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे.असेच अनेकांना वाटते. निराधार ज्येष्ठांसाठी ती आवश्यकता आहेच, पण अपत्य असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ती गरज होता कामा नये .मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटते. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा विचार वाढायला लागला आहे. मुले-मुली ज्येष्ठांना घरात ठेवतच नाहीत असे नाही; पण घरातच अपमानास्पद वागणूक देणे, दुर्लक्ष करणे, घरातील कामे सांगणे यांसारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठांनाही वृद्धाश्रमच जवळचा वाटू लागला आहे असे त्यांनी सांगितले व उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केली की तुम्ही तुमच्या घरातील वृद्ध सदस्यांना सन्मानाची वागणूक द्या व त्यांच्या आवाहनाला संमती देत विद्यार्थ्याने शपथ घेतली की आम्ही आमच्या घरातील वृद्ध सदस्यांना कधी ही वृद्धाआश्रमात पाठवणार नाही व त्याना सन्मानाची वागणूक देऊ.
यावेळेस प्रा.उषा जैन म्हणाल्या की मुला मुलींनी क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबाच्या वृद्ध लोकांची काळजी घ्यावी व त्याची हेळसांड होणार नाही याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी , तसेच यापुढे आपण समाजासाठी व आपल्या कुटुंबासाठी काय करणार आहोत याचे आज जसे नियोजन केले तसेच भविष्यात ही सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन केले
हे उपक्रम विद्यार्थ्यामध्ये करुणा आणि सहानुभूतीची शक्ती प्रदर्शित करतात आणि सामाजिक जबाबदारी आणि समुदाय सेवेच्या मूल्याची आठवण करून देतात असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन जैन यांनी सांगितले. या उपक्रमासाठी विजय कडू ,दीपक कोटमे,यांचे मार्गदर्शन लाभले.भेटीसाठी प्रा.उत्कर्षा लासुरे ,प्रा.कावेरी चौधरी, प्रा. अमृता सिंह, प्रा.अपूर्वा तोरणे, प्रा.सुवर्णा थोरात, प्रा. कांचन गुरसळ,प्रा.अक्षदा वाघचौरे,प्रा. दादासाहेब कावडे,प्रा.पूजा जाधव प्रा.वर्षा भाटी हे उपस्थित होते
सध्या बहुतांश वृद्धाश्रमात वृद्धांची सेवा ही अत्यंत निस्वार्थपने व उत्कृष्टपणे केली जाते त्यात आर जे एस फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी जी सामाजिक बांधिलकी जपत केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे