एस जे एस हॉस्पिटल ग्रुप कोपरगाव

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी औषधनिर्माणशास्र महाविद्यालायात  जागतिक फार्मसी दिन  साजरा

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी औषधनिर्माणशास्र महाविद्यालायात  जागतिक फार्मसी दिन  साजरा
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी औषधनिर्माणशास्र महाविद्यालायात  जागतिक फार्मसी दिन  साजरा
जाहिरात नोकरी मेळावा

कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन  संचलित फार्मसी महाविद्यालयात बुधवारी दिनांक २५ सप्टेंबर हा दिवस ” जागतिक फार्मसी दिन” म्हणून आनंदात साजरा करण्यात आला.”फार्मसिस्ट मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड” या वर्षीच्या फार्मसी दिनाचा केंद्र विषय होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत मेटकर असिस्टंट कमिशनर एफडीए अहमदनगर, गणेश वाणी, केमिस्ट असोसिएशन कोपरगावचे अध्यक्ष गणेश वाणी, उपाध्यक्ष भरत मोरे, मेंमबर ऑफ केमिस्ट असोसिएशन व ऑल आर मेंबर्स ऑफ केमिस्ट असोसिएशन कोपरगावचे प्रवीण गवळी, जितेंद्र गंगवाल,नितेश बंब,विजय जगताप, सचिन अमृतकर,अनिल आहेर, प्रशांत बोरावाके,रुतुल जाधव, अप्पासाहेब नवले, प्रथमेश वाणी, ओमप्रकाश डागा,नितीन दंवगे,संदीप डागा हे  उपस्थित होते

जाहिरात
 
   याप्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष  चांगदेव  कातकडे,विजय कडू,दिपक कोटमे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डाॅ.नितीन जैन ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत मेटकर यांनी विद्यार्थ्यांना ” विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास त्यांना यश हे नक्की प्राप्त होणारच तसेच फार्मासिस्टने ओषधवितरण करतांने नेहमी अंगी प्रामाणिकपणा व लोकहिताचा विचार केला  अशाप्रकारे मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रुग्णांसाठी त्याचा सल्ला हा नेहमी फायदेशीर ठरला पाहिजे” असेही म्हणाले.

जाहिरात
 उत्कृष्ट शिक्षण घेवून  रुग्णांची सेवा करण्यात शिक्षणाचा उपयोग करा  व आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करा असे  मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी चतुर्थ वर्षीच्या  फार्मसीच्या विद्यार्थीनींनी सर्व प्रकारच्या औषधाची माहिती देणारा एक सुंदर असा ॲक्ट सर्वासाठी सादर केला. त्याचबरोबर तृतीय वर्षीतील विद्यार्थिनीनी  डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेतले तर त्यांचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर कसे होता हे सर्वांना सुंदर अशा कला कृतीतून पटवुन दिले. या प्रसंगी डिप्लोमा आणि डिग्री ओफ फार्मसीच्या सर्व उच्च गुणवत्ता  धारक विद्यार्थ्यांचे  व “जागतिक औषधनिर्माणशास्र दिनाच्या” निर्मित घेतलेल्या विविध स्पर्धामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे, फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्यडाॅ.नितीन जैन  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थीचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्ताविक  कॉलेजच्या प्राध्यापिका उत्कर्षा लासुरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चतुर्थ वर्षीय च्या विद्यार्थिनीनी केले. कार्यक्रमाचे नियोजन फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका कावेरी चौधरी यांनी केले.

जाहिरात
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे