पोहेगाव येथे विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजुर- नितीनराव औताडे
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या विशेष प्रयत्नांना यश
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील जनतेच्या दृष्टिने महत्वाचे पोहेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून या ग्रामीण रुग्णालयाला मान्यता दिली. पोहेगाव येथे ३० घाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी या कामी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना ११ जुन रोजी निवेदन दिले होते. मंत्री दादाजी भुसे व माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांची त्यांना विशेष मदत झाली.
अवघ्या तीन महिन्यातच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रश्न निकाली निघाल्याने पोहेगांव परिसरात आनंदाचा वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विषयी आदराची भावना निर्माण झाली. सोशल मीडिया मार्फत जनतेपर्यंत ही माहिती पोहोचतात अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नितीनराव औताडे यांचे आभार मानले.
पोहेगाव ग्रामीण रुग्णालयात आता कोपरगाव ग्रामीण रुग्णालया प्रमाणे सुविधा मिळणार आहे.भव्य व प्रशस्त इमारतिसह ,४ मेडिकल ऑफिसर सह स्पेशालिस्ट डॉक्टरांची व आरोग्य सेवक , परिचारिका यांची देखील संख्या वाढणार आहे. रुग्णांची तपासणी,आय सी यु वॉर्ड ऍडमिट सुविधा, प्रसूती व्यवस्था ,शव विच्छेदन अदी सुविधासह विविध तपासणी यंत्र येथे उपलब्ध होणार आहे. कोपरगाव तालुक्यातील दक्षिण भागाला या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होणार आहे. पोहेगांव परिसरासह सिन्नर तालुक्यातील ग्रामीण जनतेला याचा फायदा होणार आहे.
पोहेगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर झाल्याने पोहेगांव सह चांदेकसारे, सोनेवाडी,घारी, डाऊच खुर्द,डाऊच बुद्रुक, जेऊर कुंभारी, मढी बु, मढी खुर्द, देर्डे कोऱ्हाळे ,देर्डे चांदवड,धोंडेवाडी, जवळके, बाहदराबाद, बाहदरपुर, वेस, सोयगाव, काकडी, मल्हारवाडी, रांजणगाव देशमुख,अंजणापुर, शहापूर,मनेगाव अदी सह मढी बु , देर्डे कोऱ्हाळे ,चांदेकसारे ,जवळके रांजणगाव देशमुख, काकडी या सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या जवळपास ७० ते ८० हजार नागरीकांना आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार असुन उपचारासाठी त्यांना कोपरगाव येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही असे औताडे यांनी सांगितले.