सेवा हाच धर्म या प्रमाणे स्व.कोल्हे साहेब प्रेरणास्रोत – विवेकभैय्या कोल्हे
संवत्सर येथे मोफत मोती बिंदू शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद
कोपरगाव विजय कापसे दि २२ मार्च २०२४– स्व. शंकररावजी कोल्हे यांचे प्रत्येक पाऊल हे समाज्याच्या विकासासाठी होते, दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष करण्याची नेहमी तयारी असायची. त्यामुळे शंकरराव कोल्हे हे एक व्यक्ती नसून ते एक विचार होते, जो अनेकांच्या मनामध्ये भिनला आहे, यामुळेच त्यांचे जीवन कार्य हे समाजहितासाठी दिशादर्शक ठरत आहे, त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त संवत्सर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर २० मार्च रोजी पार पडले यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून रुग्णांची आस्थेने विचारपूस केली.
तालुक्यातील विविध ठिकाणी मोफत मोतीबिंदू शिबीर घेतली जात आहे. कोल्हे साहेबांवर प्रेम करणारी माणसे असल्यामुळे आतापर्यत हजारो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.रुग्ण सेवा ही खरी सेवा समजून कोल्हे कुटुंब मोफत फिरता दवाखाना,आरोग्य शिबिरे,मोफत रुग्णवाहिका यासारखे उपक्रम राबवत सामजिक कार्याचा वसा जपत आहे.
अडल्या नडल्या व्यक्तीला आधार देणारे कुटुंब म्हणून कोल्हे परिवार सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो.सातत्याने सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक स्वास्थ्य यावर भर देण्याचे काम संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे.गरजू रुग्णांना अशा मोफत शिबिरातून दिलासा मिळत असून कोल्हे कुटुंबाचे याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहेत.
या प्रसंगी शरद नाना थोरात, ज्ञानेश्वर परजने, कैलासराव राहणे, बापूसाहेब बारहाते, राजेंद्र परजने, महेश परजने, पंडितराव भारुड, हभप पावडे महाराज, कान्हेगावच्या माजी उपसरपंच संगीता आहेर, कचेश्वर आहेर, प्रकाश भाकरे, दत्तोपंत सिनगर, रामभाऊ गिरे, बाबासाहेब सोनवणे, फकिरराव बोरनारे, रामभाऊ कासार, हभप.कर्पे महाराज, प्रकाशराव बारहाते, चिमाजीराव दैने, सचिन शेठे, दिनकरराव बोरणारे, मोहनराव निकम, योगेश परजने, बाळासाहेब भोसले, सुदामराव साबळे, गोविंदराव परजने, राजेंद्र बोरनारे, अनिलराव शेठे, शिवाजी शेटे, डॉ. नवनाथ घोलप, साहिल काळे, मनोज मालुंजकर, डॉ.सुजित सोनवणे, डॉ.मनोज बत्रा, भाऊसाहेब परजने, अण्णासाहेब निरगुडे, प्रकाश सोमसे, अनिल परजने, पठाण सर,आदींसह ग्रामस्थ व रूग्ण उपस्थित होते.