संवत्सर महावितरण उपकेंद्राला मिळाले प्रतिष्ठेचे आय.एस.ओ. मानांकन
मानांकन मिळविणारे जिल्ह्यातील एकमेव संवत्सर हे पहिलेच उपकेंद्र ठरले
कोपरगाव विजय कापसे दि २२ मार्च २०२४– महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. कोपरगाव ग्रामीण उपविभागातील विज पुरवठा करणाऱ्या ३३/११ केव्ही संवत्सर उपकेंद्राला आय.एस.ओ हे प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले असून अत्यंत कठोर निकषावर हे आय.एस.ओ. मानांकन मिळविणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हे पहिलेच उपकेंद्र ठरले असून यामुळे सर्व महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
संवत्सर उपकेंद्राने सुरक्षित आणि अखंडित विजपुरवठ्यासह सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. समर्पित भावनेने काम करणारे जनमित्र, यंत्रचालक ,बाह्य स्त्रोत कर्मचारी त्यांना पाठबळ व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी व त्यांना तितकीच मोलाची साथ देणारे सर्व शाखा अभियंता या सर्वांच्या समन्वयातून या उपकेंद्राचा अक्षरशः कायापालट झाला आहे.सर्वांच्या सहकार्यातून या उपकेंद्राने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.