आत्मा मालिक हॉस्पिटल

भारतीय खेळ प्रधिकरण (साई) अंतर्गत आत्मा मालिकमध्ये निवड चाचणी- नंदकुमार सूर्यवंशी

भारतीय खेळ प्रधिकरण (साई) अंतर्गत आत्मा मालिकमध्ये निवड चाचणी- नंदकुमार सूर्यवंशी
भारतीय खेळ प्रधिकरण (साई) अंतर्गत आत्मा मालिकमध्ये निवड चाचणी- नंदकुमार सूर्यवंशी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ मार्च २०२४: भारतीय खेळ प्रधिकरण (साई) भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील खेळातील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देता यावे या उद्देशाने ‘खेलो इंडिया रायझींग टॅलेन्ट आयडेंटिफिकेशन’ उपक्रमाअंतर्गत आत्मा मालिक स्पोर्टस अकॅडमीमध्ये दिनांक २७ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान निवडचाचणीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आत्मा मालिक चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.

जाहिरात

यावेळी बोलताना आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, आत्मा मालिक स्पोर्टस अकॅडमी मधील कुस्ती व हॉलीबॉल या कीडा प्रकारांना साईची मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र असून राज्यातील खेळाडू या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे. खेळाडूंना वाव देण्यासाठी साई हा स्तुल उपक्रम असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना साई मार्फत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात आंतराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यास निश्चितच मदत होणार आहे. आत्मा मालिकमधील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून एक किर्तीमान नोंदविला आहे. तरी या निवडचाचणीमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

जाहिरात

अधिक माहिती व नाव नोंदणी साठी संपर्क ८८३०८५५०६०, ९३२५३५२७३७ आत्मा मालिक खेलो इंडिया समन्वयक श्री. शपेंद्र त्रिपाठी सर यांच्या सोबत संपर्क साधावा अथवा आत्मा मालिक मध्ये होणाऱ्या या निवडचाचणीमध्ये कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, फुटबॉल व अॅथेलेटिक्स या किडा प्रकारामध्ये वय वर्ष ०९ ते १८ वयोगटातील मुले व मुली सहभाग घेवू शकतात. त्यासाठी खेळाडूंनी मायभारत पोर्टल https://mybharat.gov.in  या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.

नंदकुमार सूर्यवंशी
कबड्डी कीडा प्रकार दि. २७/३/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी व्हॉलिबॉल कीडा प्रकार दि. २८/३/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी खो-खो कीडा प्रकार दि. २९/३/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी फुटबॉल कीडा प्रकार दि. ३०/३/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी अॅथलेटिक्स कीडा प्रकार: दि. ३१/३/२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी वरील कीडा प्रकारामध्ये इच्छुक खेळाडू विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे