शिर्डी लोकसभा मतदार संघातील दीड लाख मातंग समाजाचे मतदान निर्णायक- शरद त्रिभुवन
शिर्डी लोकसभा मतदार संघातील दीड लाख मातंग समाजाचे मतदान निर्णायक- शरद त्रिभुवन
शिर्डी लोकसभा मतदार संघातील दीड लाख मातंग समाजाचे मतदान निर्णायक- शरद त्रिभुवन
कोपरगाव विजय कापसे दि २३ मार्च २०२४–शिर्डी लोकसभा मतदार संघ २००९पासुन अनुसूचीत जाती साठी राखीव आहे मात्र राज्यातली कोणताच पक्ष मातंग समाजातील उमेदवारास उमेदवारी जाहीर करण्यात टाळाटाळ करत असेल तर शिर्डी लोकसभा मतदार संघात असलेले मातंग समाजाचे मतदार निर्णायक भूमिका घेतील असे मत सामजिक कार्यकर्ते शरद त्रिभुवन यांनी व्यक्त केले
शरद त्रिभुवन पुढे म्हणाले की सण २००९ पासुन सातत्याने मातंग समाज शिर्डी लोकसभा मतदार संघातून मातंग समाजाचे उमेदवारास उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होता व आहे मात्र गेल्या तीन लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजातील व्यक्तीस उमेदवारी दिली नव्हती त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिर्डी लोकसभा मतदार संघात विविध तालुक्यातून मातंग समाजातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मिशन शिर्डी लोकसभा राबवले गेले विविध राजकिय नेत्यांच्या भेटी घेऊन मातंग समाजाचे उमेदवारास उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.
मात्र कोणत्याच राजकीय नेत्यांनी मातंग समाजाची दखल घेतली नाही त्यामुळे मातंग समाजातील मतदारांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे.निवडणूक जवळ आली की मातंग समाजातील काही उमेदवार समाज बांधवांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतात व प्रत्यक्ष निवडणुकीत भाग घेण्या ऐवजी सेटलमेंट करतात त्यामूळे विनाकरण प्रामाणिक कार्यकर्ते बदनाम होतात मात्र या निवडणुकी मध्ये असा प्रकार घडला तर तो खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे या वेळी सर्व सामान्य समाज बांधवांनी काळजी घ्यावी व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मातंग समाजातील व्यक्तीस उमेदवारी मिळाली नाही तर सर्व संमतीने उमेदवार जाहीर करण्यात येऊन मातंग समाजाचे उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल.