स्व. शंकरराव कोल्हे साहेबांच्या जयंती निमीत्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम
कोपरगाव विजय कापसे दि २४ मार्च २०२४–सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी सहकार, शिक्षण, शेती, पाटपाणी आदी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करत समाज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यातून साहेबांनी मनामनात जनतेचा विश्वास म्हणून जी संपत्ती जपली आहे. त्या विचारासाठी तिसरी पिढी कार्यरत असल्याचा विश्वास कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी रविवारी रोजी (दि.२४)अष्टविनायक मंडळाच्या आयोजित माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या.
सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या रविवारी ठिकठिकाणी कोपरगाव मतदार संघात जयंती निमीत्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील संपर्क कार्यालयात ही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता.
पुढे प्रथम आमदार सौ.स्नेहलताताई म्हणाला की, कोल्हे साहेबांचा ध्यास हा केवळ आणि केवळ समाज्याच्या विकासासाठी होता.त्यासाठी त्यांनी नेहमी तळमळ असायची. समाज्यातील प्रत्येक घटक हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशिल होते. आणि या कार्यातून त्यांनी जो।जनतेचा विश्वास संपादन केला होता. त्यांची तिसरी पिढी जपण्याचा प्रयत्न करत आहे, असे मार्गदर्शन करीत प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करीत केले.