कोल्हे गटमाजी आमदार सौ कोल्हे

महिला संघटन आणि बचत गटांची दखल पंतप्रधानांनी घेणे हे अभिमानास्पद –  स्नेहलताताई कोल्हे

महिला संघटन आणि बचत गटांची दखल पंतप्रधानांनी घेणे हे अभिमानास्पद –  स्नेहलताताई कोल्हे
महिला संघटन आणि बचत गटांची दखल पंतप्रधानांनी घेणे हे अभिमानास्पद –  स्नेहलताताई कोल्हे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ ऑगस्ट २०२४स्त्री सक्षम झाली तर राष्ट्र बलवान होते.कोणताही देश त्या देशातील महिला शक्तीचे योगदानावर प्रगती करत असतो.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील महिला संघटन आणि बचत गट  यांची दखल घेतल्याने वीस वर्षापासून या कामात सक्रिय असल्याने अभिमानास्पद क्षण वाटले अशी प्रतिक्रिया मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली.

जाहिरात

आमच्या संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास तीस ते पस्तीस हजार महिलांचे संघटन आणि हजारो बचत गट यशस्वीपणे सुरू आहे.या गोष्टींची दखल देश आणि राज्यपातळीवर घेतली जाते याचा विशेष आनंद आहे.कारण सद्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल माझ्या महिला भगिनी या माध्यमातून करू लागल्या.घर आणि काम यात व्यस्त असणारी गृहिणी स्वतः बँकेचे व्यवहार हाताळू लागली.बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारले गेले.बँकेचे खाते उघडण्यापासून केलेली ही सुरुवात आज कोट्यावधी रुपयांचे कर्ज बचत गटांना वितरण करताना केलेल्या संघटनाचे सार्थक वाटते.

जाहिरात

गावोगावी स्त्री शक्तीचे महत्व पटवून देत गटांच्या स्थापना जवळपास वीस वर्ष आधी सुरू केल्या त्यांची संख्या आज हजारोंच्या घरात आहे.महिला बचत गटाच्या चळवळीतून हजारो महिला स्वावलंबी झाल्या.अनेकांचे प्रपंच सावरण्यासाठी मदत झाली तर अनेक भगिनींनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले.महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे त्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासाठी महिला बचत गटांचे संघटन उपयुक्त ठरणार आहे.

जाहिरात

जगात ज्या देशांनी प्रगती साध्य केली त्यांनी महिलांना स्वायत्तता दिली. शिक्षण, रोजगार,आर्थिक स्वातंत्र्य यातून महिला निश्चितच राष्ट्रप्रगतीसाठी आपला मोलाचा वाटा उचलतात. कौटुंबिक जबाबदारी पार पाडून सामाजिक विकासाचे कर्तव्य जपणाऱ्या महिला भगिनींबद्दल पंतप्रधानांचे गौरवोद्गार हे आमच्या सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहेत असे शेवटी सौ.कोल्हे म्हणाल्या.

जाहिरात मुक्त

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे