राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत ओगदी शाळेचे घवघवीत यश
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत ओगदी शाळेचे घवघवीत यश
राज्यात प्रथम १८ पैकी ५ विद्यार्थी ओगदी शाळेचे

कोपरगाव विजय कापसे दि २५ मार्च २०२४–शैक्षणिक,सामाजिक,पर्यावरण जागृती हीच आपली खरी संपत्ती व संस्कृती या म्हणीप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खोंदला येथील राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने “मी ज्ञानी होणार” या टॅगलाईनने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील ओगदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे.

या राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा परीक्षेत राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात १८ विद्यार्थी प्रथम आले असून त्यात ओगदी जिल्हा परिषद शाळेतील अंजली गंगाराम गोणटे, अनुराधा माधव सोनवणे, गीता दशरथ जोरवर, वैष्णवी जगन्नाथ जोरवर व रोहन दयानंद सोनवणे या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेत राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल करत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.





