आत्मा मालिक हॉस्पिटल

आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये मिळणार अत्यंत अल्प दरात सर्वाना उपचार- नंदकुमार सूर्यवंशी

आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये मिळणार अत्यंत अल्प दरात सर्वाना उपचार- नंदकुमार सूर्यवंशी

सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ मार्च २०२४कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित नव्या रूपात सर्व अत्याधुनिक सुविधांसह कार्यान्वित असलेल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सर्वांना अत्यंत अल्प दरात वेगवेगळ्या योजनांच्या आधीन राहून उपचार मिळणार असल्याची माहिती आत्मा मालिक ध्यानपिठाचेअध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.

जाहिरात

आत्मा मालिक ध्यानपिठाचेअध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी या हॉस्पिटल विषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आत्मा मालिक हॉस्पिटल हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त हॉस्पिटल असून यात अपघात,अतिदक्षता,हृदयरोग,युरो सर्जरी, अस्थिरोग, बालरोग, डायलेसिस, मेंदू रोग, नेत्ररोग, कर्करोग, कान, नाक, घसा, दंतरोग, फिजिओथेरपी आदी विभागात अत्याधुनिक मशीनद्वारे तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार अत्यंत माफक दरात संपूर्ण उपचार केले जात आहे.

जाहिरात
विशेष म्हणजे २०२४-२५ या वर्षांमध्ये आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजने अंतर्गत आश्रमातील संत व आश्रमनिवासी साधक, आश्रमाचे विश्वस्त, पदाधिकारी व स्थानिक शाखा सदस्य, आश्रमाचे भाविक, आश्रमातील विद्यार्थी व पालक, आश्रमातील कर्मचारी त्यांचे कुटुंब व नातेवाईक, सर्वच केसरी व पिवळे रेशन कार्ड धारक, कोकमठाण सावळीविहीर, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, कोपरगाव, शिर्डी परिसरातील स्थानिक रहिवाशी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी,महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, नगर जिल्ह्यातील सर्वच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस अधिकारी कर्मचारी, आजी-माजी सैनिक आदींसह संपूर्ण राज्यातील पत्रकारांना वेगवेगळ्या योजनेचे द्वारे  उपचार, तपासणी तसेच गोळ्या औषधावर वेगवेगळ्या पद्धतीने सूट देत अत्यंत अल्प दरात संपूर्ण उपचार दिले जाणार असून तरी वरील गटातील पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सूर्यवंशी यांनी करत अधिक माहितीसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल प्रशासनाशी अथवा ९०९० ९१९१ ९६, ८६६९ ६०१० ०० व ९१५६ ०३३२ २१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे