पढेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाच्या मुक्ता बर्डे यांची बिनविरोध निवड
पढेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाच्या मुक्ता बर्डे यांची बिनविरोध निवड
कोपरगाव विजय कापसे दि २८ मार्च २०२४–कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाणारी पढेगाव ग्रामपंचायतीमध्ये युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाच्या सौ.मुक्ता बर्डे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. त्याच्या निवडीबद्दल कोपरगाव मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील मौजे पढेगाव ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाचे नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त महिला उपसरपंच म्हणून मुक्ता नामदेव बर्डे यांना बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परजणे गटाच्या लक्ष्मण विश्वनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.या ग्रामपंचायत मध्ये कोल्हे परजणे युतीचे सर्वाधिक सदस्य निवडून आलेले आहेत. पढेगावच्या सरपंच मीना बाबासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची आज रोजी बैठक झाली. या बैठकीच्या प्रशासकीय सहाय्यक म्हणून बी. एम. गुंड यांनी काम पाहिले. सदस्य बाबासाहेब भगीरथ शिंदे यांनी निवडीचा प्रस्ताव मांडला, त्यास लक्ष्मण विश्वनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले.
या प्रसंगी बाबासाहेब भगीरथ शिंदे, उषा संपत तरटे, सुवर्णा महेश म्हस्के, बाबासाहेब दामू आहेर, मुक्ता नामदेव बर्डे, लक्ष्मण विश्वनाथ शिंदे, दत्तू वसंत मापारी, प्रियंका मोहन कर्पे आदिसह कोल्हे परजणे गटाचे सदस्य उपस्थित होते. तर निवडणुकीदरम्यान काळे गटाचे सर्व तीनही सदस्य गैरहजर होते. याप्रसंगी उत्तमराव चरमळ, प्रकाश किसन शिंदे, संपत हरिभाऊ तरटे, पंढरीनाथ सुखदेव म्हस्के, नामदेव बर्डे, विनोद आहेर, गंगाधर आहेर, दिनकर आहेर विजयराव जाधव आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.