श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चैत्राली सिनगरची राज्यस्तरीय प्रदर्शनसाठी निवड
श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चैत्राली सिनगरची राज्यस्तरीय प्रदर्शनसाठी निवड
श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कु. चैत्राली विलास सिनगर हिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय Inspire MANAK प्रदर्शन (गोंदिया) येथे निवड झाली आहे.

शिर्डी विजय कापसे दि १९ नोव्हेंबर २०२५–भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या वतीने दिनांक १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दा.ह. घाडगे पाटील विद्यालय, त्रिमूर्ती शैक्षणिक व सांस्कृतिक संकुल, त्रिमूर्तीनगर, नेवासा फाटा, ता. नेवासा येथे Inspire MANAK जिल्हास्तरीय प्रदर्शन (DLEPC) आयोजन करण्यात आले होते,त्यामध्ये श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलकडील आठवीची विद्यार्थिनी कु. चैत्राली विलास सिनगर हिने आपली विज्ञाननिष्ठ कल्पकता आणि अभिनव प्रकल्प सादरीकरण करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

चैत्रालीच्या या यशामध्ये शाळेचे प्राचार्य आसिफ तांबोळी, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी, तसेच विज्ञान विषयांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले. या विशेष यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्र. प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी चैत्रालीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.





