आपला जिल्हा

डोंगराळ घटनेचा कोपरगावात सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध

डोंगराळ घटनेचा कोपरगावात सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध
डोंगराळ घटनेचा कोपरगावात सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ नोव्हेंबर २०२५-मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली याच पार्श्वभूमीवर कोपरगावात देखील सकल सुवर्णकार समाजच्या वतीने एकत्र येत जाहीर निषेध करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावात एका नराधम तरुणाने साडे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचे दगडाने डोके ठेचून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सदर घटनेतील नराधमाला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी याकरिता या घटनेचा खटला  फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याला सर्वांसमोर जाहीर रित्या फाशी द्यावी अशी मागणी कोपरगाव सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच निवेदन कोपरगावचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे व शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देत  कोपरगावातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे.

जाहिरात
याप्रसंगी  माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुल काले, अनिल जाधव , प्रकाश भडकवाडे, अविनाश बागुल, महेंद्र कुलकर्णी, कैलास नागरे,दिनेश देवळालीकर, राहुल बागुल , हस्तशिल्प सुवर्णकारागीर वेल्फेअर असोसिएशन संस्था अध्यक्ष दिपक भालेराव कोपरगाव सराफ असोसिएशन अध्यक्ष अनिकेत भडकवाडे, नंदकुमार जाधव , अविनाश वाघ,राजेंद्र वाघ,सुवर्णकार भारती सेवा संस्थान जिल्हाध्यक्ष संजय खरोटे,गणेश विसपुते ,दिनेश वर्मा,अक्षय वर्मा अनिल दाभाडे, कृष्णा विसपुते ,आदीसह समस्त स्वर्णकार समाज व स्वर्णकार भारती सेवा संस्थानचे सर्वपदाधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे