नाशिक येथील गोदामाई स्वच्छ्ता अभियानाचा “शतकमहोत्सव” जल्लोषात साजरा
नाशिक येथील गोदामाई स्वच्छ्ता अभियानाचा “शतकमहोत्सव” जल्लोषात साजरा
नाशिक विजय कापसे दि ८ एप्रिल २०२४– गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे गोदामाई प्रतिष्ठान नाशिक कार्याध्यक्ष सृष्टी देव आणि आबासाहेब देव यांच्या अंतर्गत गेली ९९ आठवड्या पासून गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते या मोहिमेस रविवारी १०० आठवडे पूर्ण झाली असून हा शतकमहोत्सव अत्यंत आनंदात,जल्लोषात गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, उपाध्यक्ष तथा सिनेअभिनेते चिन्मय उदगिरकर, किरण भालेराव, राजेश पंडित, चंदू पाटील ,डॉ सौदागर आदींच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आई गोदावरी ची महापूजा, महाआरती उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते व गेली ९९ आठवडे अविरतपणे स्वछता करणारे १५० गोदामाई सेवकांच्या साक्षीने करत “सूसाई हेल्थ केअर सर्व्हिसेस” या ल्युपिड डायगोणस्टिक लॅब अंतर्गत आरोग्य शिबिर चे देखील घेण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी गोदामाई पत्रावळी दत्ता कोठावदे यांनी तर कासियो वादक दिव्यांशू सिनकर याने गोदा संवर्धन गीत सादर केले.