आमदार आशुतोष काळे

आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून ८३ दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचा आधार

 

आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून ८३ दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचा आधार

दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान -आ. आशुतोष काळे

   कोपरगाव विजय कापसे दि ८ एप्रिल २०२४ :- दुर्दैवाने होणाऱ्या अपघातामुळे किंवा दुर्धर आजाराणे आलेल्या अकाली अपंगत्वामुळे बहुतांश दिव्यांग बांधवाना अनेक समस्यांना तोंड देत परावलंबी जीवन जगावे लागते. मात्र कृत्रिम अवयवाच्या सहाय्याने दिव्यांग बांधवांच्या समस्या कमी होवून त्यांचे परावलंबी जीवन बऱ्याच प्रमाणात कमी होवून त्यांच्या वेदना कमी झाल्याचे मोठे समाधान मिळाले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

जाहिरात

कोपरगाव येथील के.जे. सोमैय्या महाविद्यालयात  कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग, मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे, के.जे. सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव व लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून ‘मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपी शिबिरात’ दिव्यांग बांधवांना त्यांच्या हस्ते जयपूर फुटचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की, अकाली येणाऱ्या अपंगत्वामुळे दिव्यांग बांधवांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत कृत्रिम अवयव या दिव्यांग बांधवांना जगण्याचे बळ मिळणार आहे. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालून त्यांना अपंगत्वाच्या होणाऱ्या वेदनांपासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे जीवन स्वालंबी होवून निश्चीतपणे जगण्याची नवी उमेद निर्माण होणार असल्याचे समाधान मिळाले आहे. यावेळी ८३ दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

यावेळी कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबईचे डॉ. पोथीराज पिचायी, साधू वासवानी मिशन पुणेचे सुशील ढगे, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. रिद्धी गोराडिया, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, विश्वस्त संदीप रोहमारे, के.जे. सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, संतोष गंगवाल, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, माजी नगरसेवक मंदार पहाडे, अजीज शेख, सुनील बोरा, शैलेश साबळे, योगेश वाणी, नारायण लांडगे, राजेंद्र बोरावके, अमोल गिरमे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे