कोपरगाव तालुका आरोग्य विभागात मंजूर पदा पैकी तब्बल ७९ पदे रिक्त; तालुका आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार
कोपरगाव तालुका आरोग्य विभागात मंजूर पदा पैकी तब्बल ७९ पदे रिक्त; तालुका आरोग्य यंत्रणेवर
कोपरगाव विजय कापसे दि ९ एप्रिल २०२४- कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र ६ असून त्या अखत्यारित ३१ उपकेंद्र असून या आरोग्य यंत्रणे मार्फत दररोज मोठ्या संख्येने तालुक्यातील अनेक कुटुंब उपचार करून घेत असतात परंतु या तालुका आरोग्य व्यवस्थेत एकूण १८४ पदे मंजूर असून त्यात ७९ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण येत आहे.
कोपरगाव पंचायत समिती मार्फत आरोग्य विभागाचे संपूर्ण तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे यात चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सांगवी भुसार, सुरेगाव, वेळापूर, कोळपेवाडी, धामोरी, चास हे ६ आरोग्य उपकेंद्र, दहेगाव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्रात दहेगाव बोलका, गोधेगाव, पढेगाव, करंजी ही ४ आरोग्य उपकेंद्र, संवत्सर या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोकमठाण, शिंगणापूर, संवत्सर, जेऊर कुंभारी ही ४ आरोग्य उपकेंद्रे, पोहेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहेगाव बुद्रुक, देर्डे कोराळे, जवळके, रांजणगाव देशमुख, चांदेकसारे, मढी बुद्रुक, काकडी ही ७ आरोग्य उपकेंद्रे, टाकळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात धारणगाव, मुर्शतपर, कुंभारी, ब्राह्मणगाव, येसगाव, रवंदा ही ६ आरोग्य उपकेंद्र तर वारी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कान्हेगाव,धोत्रे, वारी, भोजडे हे ४ आरोग्य उपकेंद्र तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व नागरी प्राथमिक आरोग्य कार्यालय कोपरगाव हे विभाग येतात या विभागात वेगवेगळ्या १८ विभागातील पदामध्ये एकूण १८४ पदे मंजूर असताना शासनाकडून फक्त १०५ पदे भरली गेली आहे तर अद्यापही ७९ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण निर्माण होत त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कोपरगाव तालुक्यातील वरील सर्व ६ प्राथमिक व ३१ आरोग्य उपकेंद्रातील व मुख्य कार्यालयातील रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.
लवकरच पदे भरली जाणारतालुक्यातील आरोग्य विभागातील सर्वच रिक्त पदे जिल्हा कार्यालयाकडून लवकरच नवीन भरती, पदोन्नती तसेच बदली प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहे.डॉ विकास घोलपतालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती कोपरगाव