आपला जिल्हा

कोपरगांवात डॉ.केशव हेडगेवार यांची जयंती साजरी

कोपरगांवात डॉ.केशव हेडगेवार यांची जयंती साजरी

कोपरगांवात डॉ.केशव हेडगेवार यांची जयंती साजरी

कोपरगाव विजय कापसे दि १० एप्रिल २०२४कोपरगांव येथील नगरपरिषदचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची तिथीनुसार १३५ वी जयंती साजरी करण्यात आली आहे.

जाहिरात

या प्रसंगी माजी सैनिक सुभेदार मारुतीराव कोपरे, सरकारी अभियोक्ता अॅड. अशोकराव टुपके यांचे शुभहस्ते डॉ. केशव हेडगेवार यांच्या नवीन प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कोपरगांव नगरपरिषदचे सार्वजनिक वाचनालयात जुनी इमारत असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे सह लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांचे तैलचित्र होते. नवीन ईमारत बांधकाम झालेवर त्या ठिकाणी पुर्वीच्या प्रतिमा पुर्नस्थापित करणेबाबत स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. कोपरगांव नगरपरिषदचे दखल घेत मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी तातडीने डॉ. हेडगेवार यांची प्रतिमा पुर्नस्थापित केली आहे. या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपूर्ण विश्वात संघटनात्मक आणि सर्मर्पित राष्ट्रीय कार्य प्रेरणादायी आहे.

जाहिरात

या प्रसंगी वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जोशी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विजय गुरव, विजय जोशी,नरेंद्र डंबीर,सुरेश कांगुणे, तालुका कार्यवाह निलेश जाधव,उपखंड प्रमुख वैभव राजगुरू, सुशांत खैरे, ललित ठोंबरे, सतिष चव्हाण, यांचे सह वाचनालयातील कर्मचारी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक विजय जोशी यांनी डॉ. केशव हेडगेवार यांचे विषयी माहिती दिली. तर रवींद्र निकम यांचे समवेत सामुदायिक प्रार्थना झाली. सुत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.

या प्रसंगी डॉ केशव हेडगेवार यांची जयंती समर्पणातून विविध स्पर्धा आणि उपक्रमातून साजरी करणार असल्याचे समितीने सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे