बिपीनदादा कोल्हेसंजीवनी साखर कारखाना

तीन हजार कोटीच्या वल्गना करणाऱ्यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वे कडे आणण्यासाठी काय केले – बिपीनदादा कोल्हे. 

तीन हजार कोटीच्या वल्गना करणाऱ्यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वे कडे आणण्यासाठी काय केले – बिपीनदादा कोल्हे. 
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत

कोपरगांव विजय कापसे दि १० एप्रिल २०२४– तीन हजार कोटींच्या वल्गना करण्यापेक्षा पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामासाठी किती निधी आणला.  चालु वर्षी पर्जन्यमान कमी झाले, परिणामी उसाचे उत्पादन घटले त्याचा परिणाम पुढच्या गळीत हंगामावर मोठ्या प्रमाणांत जाणवणार असुन शेतकरी सभासदांकडील उभे असलेले उसाचे पीक व खोडवा जगविण्यांचे मोठे आव्हान असून उन्हाचा तडाखा प्रचंड आहे तेंव्हा मायबाप शासनाने गोदावरी कालव्यांना तातडीने एक पाटपाण्यांचे आर्वतन सोडावे अन्यथा शेतकरी उध्दवस्त होईल अशी भिती संजीवनी उद्योग सुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली.

जाहिरात

             सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक राजेंद्र व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्वाती कोळपे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

जाहिरात

           प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यांत आले. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी चालु गळीत हंगामाचा आढावा घेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली केंद्र शासनाने इथेनॉलबाबत घेतलेल्या धरसोडीच्या धोरणामुळे सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांस त्याचा मोठ्या प्रमाणांत आर्थीक फटका बसल्याने त्याबाबत मा. न्यायालयात दाद मागितली असुन त्याचा निर्णय लवकरच अपेक्षीत आहे त्यातुन केंद्र स्तरावर सर्वच साखर कारखान्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने मुक्त अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या स्पर्धेला तोंड देण्यांसाठी कारखान्याचे अभ्यासू नेतृत्व विवेक भैय्या कोल्हे यांच्या सार्थीने अनेक नव नविन प्रकल्प हाती घेतले असुन ते येत्या सहा महिन्यात पुर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्ष मनेष गाडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी झाली त्यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सभासद् शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत, संचालक राजेंद्र कोळपे यांचा सत्कार केला.
          श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेती आणि पाणी या दोन बाबींचा संपुर्ण आयुष्यभर ध्यास घेत त्यासाठी संघर्ष केला. सन २००० मध्ये त्यांनी विधीमंडळात तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पाण्यांची समृध्दी निर्माण व्हावी यासाठी मंजुरी मिळविली पण त्यानंतर सत्तेत आलेल्याकडुन पुरेशा प्रमाणांत त्यांचा पाठपुरावा झाला नाही त्याची मोठी झळ बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना बसली आहे, त्यातच आज जे सत्तेत आहे त्यांच्या वडिलांच्या काळातच समन्यायी  पाणी वाटपाचा कायदा 2005 साली झाल्याने शेतकरी पुरता होरपळत आहे,  लोकप्रतिनिधी अन्य कामात व्यस्त आहेत. अहमदनगर नाशिक मराठवाडा या प्रादेशिक पाणी वादात शेतकरी नागवला जात आहे. परिसरातील विहीरींनी पाण्याचा तळ गाठला आहे, जनावरांसह नागरिकांना पिण्यांच्या पाण्यांच्या प्रश्नांला तोंड द्यावे लागत आहे, मुळ समस्यांना थापा मारून बगल देण्यांचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत.
           माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या गोदावरी खा-यात पाण्यांची समृध्दी व्हावी यासाठी न्यायालयीन लढयाबरोबरच स्वतःच्या शासनाविरूध्द संघर्षाची भूमिका घेत आळंदी, पालखेड, वाघाड, काश्यपी, वालदेवी, गौतमी गोदावरी, मुकणे, भाम, मुकणे उंचीवाढ, भावली आदि धरणांच्या कामांना चालना दिल्यानेच १९८४ पासुन ते आजपर्यंत शेती, शेतकरी व पाटपाण्यांची परिस्थिती टिकुन राहिली मात्र येथुन पुढच्या काळात पाटपाण्यांसह सर्वच प्रश्न गंभीर होतील, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांची हक्काच्या पाण्यांसाठी व पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे आणण्यांच्या कामात न्यायालयासह सर्व पातळीवरील लढाई सुरू आहे असे सांगून मधुमेही रुग्णांसाठी लवकरच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शुगर लेस शुगर तयार करणार असून त्याबाबतच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत असेही ते म्हणाले. 
            याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, रमेश घोडेराव, सतिष आव्हाड, ज्ञानेश्वर होन, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, त्रंबकराव सरोदे, निवृत्ती बनकर, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, बापूराव बारहाते, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, विलासराव माळी, अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, फकिरराव बोरनारे, अशोक औताडे, डॉ गुलाबराव वरकड, साहेबराव रोहोम, शरद थोरात, शिवाजीराव देवकर, अंबादास देवकर, संजय होन, विजयराव आढाव, सोपानराव पानगव्हाणे, कैलास माळी, अशोक भाकरे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, विलास कुलकर्णी, दिपकराव गायकवाड, संभाजीराव गावंड, मनोहर शिंदे, गणपतराव दवंगे, वेणूनाथ बोळीज, रामनाथ चिने, सोपानराव कासार, रामदास शिंदे, भिमा संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, जितेंद्र रणशुर, विक्रम पाचोरे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, उस उत्पादक सभासद, कामगार, उसतोडणी मजुर, ट्रक ट्रॅक्टर चालक मालक, खाते प्रमुख, खते प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. सचिव टी. आर. कानवडे यांनी सूत्रसंचलन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे