काळे गट

नरेश राऊत फाउंडेशनच्या पुढाकारातून काकडीच्या शाळेला आर.ओ. प्लॅंट भेट

नरेश राऊत फाउंडेशनच्या पुढाकारातून काकडीच्या शाळेला आर.ओ. प्लॅंट भेट

न्यू इंग्लिश स्कूल काकडीच्या विद्यार्थ्यांना मिळतेय शुद्ध पाणी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० एप्रिल २०२४ :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला नरेश राऊत फाउंडेशन या सेवा भावी संस्थेतर्फे नुकताच आर.ओ. प्लॅंट भेट देण्यात आला असून त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाली असून पालकांनी व शिक्षकांनी नरेश राऊत फाउंडेशनचे आभार मानले आहे.

जाहिरात

 काकडी व परिसरातील आजूबाजूच्या दुष्काळी गावातील गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुमारे दोन दशकापूर्वी मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी माध्यमिक विद्यालय सुरु केले. ५ वी ते १० पर्यत शिक्षण घेत असलेल्या या विद्यालयाची आजची विद्यार्थी संख्या २९७ असून आजवर २००० पेक्षा जास्त विद्यार्थी  आपले माध्यमिक शिक्षक पूर्ण करून मोठ्या शहरात व विमान प्राधिकरणात उच्च पदावर कार्यरत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे. शाळेच्या अवतीभोवती अनेक भौतिक सुविधा व निसर्गरम्य परिसर असून पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या बोरवेलला पुरेसे पाणी देखील आहे. हे पाणी शुद्ध करून विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी यापूर्वी देखील शाळेला सरळ हाताने मदत करणाऱ्या नरेश राऊत फाउंडेशन या सेवा भावी संस्थेकडे पालक व शाळेने आर.ओ. प्लॅंटची मागणी केली होती.

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला आर.ओ. प्लॅंट चे लोकार्पण प्रसंगी नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत, सचिव लक्ष्मणराव गोर्डे, प्रभाकर गुंजाळ, काकडीचे पोलीस पाटील मधुकर गुंजाळ, मल्हारवाडीचे पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ, मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे आदी.

शाळेला असलेली आर.ओ. प्लॅंटची गरज व शुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य जपले जाणार होते. त्यामुळे सदरच्या मागणीची तातडीने दखल घेऊन नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत यांनी पुढाकार घेत काकडीच्या न्यू इग्लिश स्कूलला आर.ओ. प्लॅंट सप्रेम भेट दिला आहे. नुकतेच नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत व सचिव लक्ष्मणराव गोर्डे यांच्या हस्ते या आर.ओ. प्लॅंट चे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. याप्रसंगी काकडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गुंजाळ, काकडीचे पोलीस पाटील मधुकर गुंजाळ, मल्हारवाडीचे पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ, मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे,शगीर शेख, जयश्री पानसरे,  सुजाता नेहे, साजन पोकळे तसेच काकडी व परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते. आर.ओ. प्लॅंट कार्यान्वित करण्यात आला असून शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे