कोल्हे गटबिपीनदादा कोल्हे
देशाला प्रत्येक क्षणी रतन टाटा यांची उणीव जाणवेल असे योगदान – बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि १० ऑक्टोबर २०२४–ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या तीन दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचे निधन झाल्याने उद्योग विश्वाची मोठी हानी झाली आहे.कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती.भारतीय उद्योगजगाला,भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं.त्यांच्या निधनानंतर सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्यातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रतनजी टाटा यांचे देशाच्या जडणघडणीत असलेले योगदान किती मोठे आहे तसेच टाटांनी आयुष्यात प्रत्येक माणूस जपला अशा भावना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केल्या.