के जे सोमय्या कॉलेज

सोमैया व रोहमारे महाविद्यालयाचे रवींद्र ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी नुकतीच जाहीर

 सोमैया व रोहमारे महाविद्यालयाचे रवींद्र ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी नुकतीच जाहीर

के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही उच्च पदवी नुकतीच जाहीर 

कोपरगाव विजय कापसे दि १२ एप्रिल २०२४कोपरगाव येथील के.जे.  सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही उच्च पदवी नुकतीच जाहीर झाली आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.

जाहिरात

प्रा. रवींद्र ठाकरे यांचा पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या वतीने विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, चासनळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. जी. बारे, हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो. डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे व प्रा. सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला.

जाहिरात

याप्रसंगी हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, ” डॉ. रवींद्र ठाकरे यांनी ‘बृजेश सिंह की गजलों में पर्यावरण चेतना’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना (डॉ.) अनिता नेरे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. रवींद्र ठाकरे हे के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे दुसरे संशोधक विद्यार्थी आहेत. डॉ. रवींद्र ठाकरे यांनी संशोधनाबरोबरच आपले अनेक शोधनिबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. ते गेल्या १७ वर्षांपासून महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात येवला येथे हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.” डॉ. ठाकरे यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड्  संजीव कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे