आपला जिल्हा

बेशिस्त वाहन धारकांवर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५ हजार ५०० रुपये दंड वसूल 

बेशिस्त वाहन धारकांवर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५ हजार ५०० रुपये दंड वसूल 

बेशिस्त वाहन धारकांवर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५ हजार ५०० रुपये दंड वसूल 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ जुन २०२५संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कोपरगाव शहराचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार गुरुवार दि १२ जून रोजी रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारताच पहिल्याच दिवशी सांगितल्याप्रमाणे अवैध धंद्याविरुद्ध तसेच बेशिस्त वाहन धारकांविरुद्ध आपल्या कारवाईचा बडगा उगारात पहिल्याच दिवशी शहरात आपल्या शिस्तीच्या कामाचा ठसा उमटवल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे तर अवैध धंदे वाल्यांच्या मनात धडकी उभी राहिली आहे.

जाहिरात

पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या कामाचा पदभार स्वीकारताच शहरातील गांधीनगर परिसरातील जुगार आड्ड्यावर तसेच टाकळी गावात गावठी हातभट्टीवर छापा टाकत कामाला सुरुवात करत शुक्रवारी दि १३ जून रोजी सकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नाकाबंदी करत तब्बल ५१ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत २५ हजार ५०० रुपयेचा दंड वसूल केला आहे.

जाहिरात

या कारवाईमध्ये विना लायसन्स वाहन चालवणाऱ्या २८ वहान चालकाकडून १४ हजार रुपयांचा दंड, फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या १ वाहन चालकाकडून १ हजार रुपयाचा दंड, ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या २ वाहन चालकांकडून २ हजार रुपयाचा दंड, कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या एका वाहन चालकांकडून ५०० रुपयेचा दंड तर वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती घेऊन जाणाऱ्या ५ वाहन चालकांकडून १ हजार रुपयेचा दंड असा ५१ वहानचालकांकडून तब्बल २५ हजार ५०० रुपयेचा दंड वसूल केल्याने वाहन चालकांना इथून पुढे कोपरगाव शहरात येताना वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करूनच  यावे लागेल.

सदरची कारवाई शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,पोलिस हेड कॉन्स्टेबल दिगंबर शेलार, एकनाथ लिंबोरे, जे.पी. तमनर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, भांगरे आदी पोलिसांनी केली आहे

जाहिरात गौतम
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहने सायलेन्सर लावून फिरत असून या वाहनावर तसेच ते वापरणाऱ्या चालक मालकांविरुद्ध देखील पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे