डॉ. आंबेडकर व फुलेंच्या जयंती निमित्ताने कोपरगावात प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य “मी सावित्री बोलते” सादर
डॉ. आंबेडकर व फुलेंच्या जयंती निमित्ताने कोपरगावात प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य “मी सावित्री बोलते” सादर
रिपब्लिकन सेना व फुले जयंती समितीच्या वतीने आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि १४ एप्रिल २०२४– भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवार १४ एप्रिल रोजी असलेली जयंती व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची गुरुवार दि ११ एप्रिल रोजी आसलेली जयंती रिपब्लिकन सेना व फुले-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शनिवार दि १३ एप्रिल २०२४ रोजी कोपरगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ रिपब्लिकन सेना व फुले-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवा निमित्त ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवीकाका बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथील वैशाली धाकुळकर यांचे प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य “मी सावित्री बोलते” आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य परशराम साबळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष यादवराव त्रिभुवन, जिल्हाउपाध्यक्ष अरविंद विघे, डॉ गोरख रोकडे, तालुकाध्यक्ष विजय शिंगाडे, उपाध्यक्ष रायभान पगारे, जालिंदर मोकळ, शहराध्यक्ष आप्पासाहेब पाठक, शहर उपाध्यक्ष बाळू कोपरे, शहर संघटक सुरेश आहिरे, तालुका युवक अध्यक्ष अनिल खरात, महिला तालुका अध्यक्ष सविता विधाते, महिला शहराध्यक्ष सविता साळवे आदी सह रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व फुले-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.






