सशक्त आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी महामानवाच्या विचारांची आवश्यकता : मा. आ.स्नेहलताताई कोल्हे
युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने विविध ठिकाणी महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

त्या, कोपरगावतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉ.आंबेडकर जयंती निमीत्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. डॉ. आंबेडकर जयंती निमीत्ताने विविध ठिकाणी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे व युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिवादन करून जयंती साजरी केली.

कोपरगावातील बस स्थानकात आयोजित उत्सव कमिटीच्या अभिवादन कार्यक्रमात मा.आ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, कोपरगाव शहरातील बस स्थानकाच्या नुतनीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करत आज सुसज्ज असे बस स्थानकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने अभिवादन करतांना मनस्वी आनंद होत आहे. स्व.शंकररावजी कोल्हे साहेबांच्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची नेहमी छाप दिसायची. त्यांनी सदैव डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करीत आंबेडकरी जनतेची नेहमीच सेवा केली आहे, त्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी नेहमी तत्पर असायचे असे सौ.कोल्हे ताई म्हणाल्या.

सामाजिक ऐक्य आणि देशाला जगातील आदर्श घटना देणारे महामानव हे आपली ऊर्जा आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील माणसाला सर्वोच आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणारे मूल्य जनमानसात रुजविले.अतिशय प्रगल्भ अभ्यास आणि दूरदृष्टी डॉ.आंबेडकर यांनी दाखविल्याने जगात भारत एक महत्वाचा देश म्हणून नावाजला गेला.कोल्हे परिवार आणि आंबेडकरी समाज यांचे अतूट असे ऋनानुबंध आहेत अशी भावना या निमित्ताने विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली.

पोहेगावात देखील युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या प्रसंगी नितीनराव औताडे, बापुसाहेब औताडे, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, रमेश औताडे, अशोक औताडे, अप्पासाहेब औताडे, सुकदेव भालेराव, रामनाथ भालेराव, रवींद्र भालेराव, शंकर औताडे, विजय भालेराव, बाबासाहेब वाघमारे, प्रमोद भालेराव, अमोल औताडे, निखिल औताडे, बाळासाहेब भालेराव, ठोंबरे गुरुजी आदी उपस्थित होते.
