आपला जिल्हा

संवत्सर गावात उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

संवत्सर गावात उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
संवत्सर गावात उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
कोपरगाव विजय कापसे दि १४ एप्रिल २०२४कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात आज रविवार दि १४ एप्रिल रोजी विविध संघटनेच्या व युवकांच्या वतीने विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.

जाहिरात
संवत्सर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच विवेक परजणे,  शिरीष लोहकने, मधुकर साबळे, सोमनाथ निरगुडे, शशिकांत ससाणे, मोहन सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, बंडूनाना आचारी, नामदेव पावडे आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले.

जाहिरात
संवत्सर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या  प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बाबुराव मैंद, पंडित भारुड, महेश परजणे, कुंदा भारुड आदी उपस्थित होते.

जाहिरात
डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, सकल आंबेडकर समाज व आण्णाभाऊ साठे विचार मंच संवत्सर यांच्या वतीने  देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांचा प्रतिमेस अभिवादन केले तर .या प्रसंगी औरंगाबाद हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील डॉ अजित झोडगे व सुजित झोडगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधानाचे व शिक्षणाचे महत्त्व उपस्थितांना सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती सांगितली.
याप्रसंगी किशोर मैंद, राहुल भिवसने, संदीप मैंद, विलास गवळी, प्रमोद रगडे, अर्जुन कांबळे, निलेश कांबळे, अमोल कानगरे, पंडित भारुड, संतोष मैंद, वसंत दाभाडे, आकाश केदारे, प्रशांत आहेर, कैलास पांडव, अरविंद आचारी, मोहन अष्टेकर आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे