शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका
शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका
वाघमारे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा दिल्याने मोठा गट काँग्रेस मधून बाहेर पडण्याची शक्यता?

कोपरगाव विजय कापसे दि २४ एप्रिल २०२४ –सबंध देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप उमेदवाराची समोरासमोर लढत असताना अनेक ठिकाणचे काँग्रेस पदाधिकारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत सत्ताधारी गटात प्रवेश करत असून त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस पक्ष कमकुवत होत चालला असताना यातच अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे.

गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षात काम करत असलेले वाघमारे यांनी दोन वर्षापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्याच्या हिशोबाने तयारी करत संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे मजबूत संघटन उभे करत गावागावात काँग्रेस पक्ष पोहचवला होता परंतु निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत महाविकास आघाडी मार्फत ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवत जोरदार प्रचाराला सुरुवात केली असताना चार दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उत्कर्ष रूपवते यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित कडून उमेदवारी मिळवत उमेदवारी अर्ज भरला असताना बुधवार दि २४ एप्रिल रोजी काँग्रेस मध्ये नाराज असलेले अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती राजेंद्र वाघमारे यांनी देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीहंबीरे यांना पत्र पाठवत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात याचा मोठा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना बसणार आहे.

राजेंद्र वाघमारे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यास ठाम असून ते उद्या गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून? काँग्रेस पक्ष त्यांची समजूत काढण्यात किती यशस्वी ठरते हे येणारा काळच ठरवेल?





