आपला जिल्हा

काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले राजेंद्र वाघमारे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले राजेंद्र वाघमारे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ;बौद्ध समाजात संतापाची लाट

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि २५ एप्रिल २०२४अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नात्यागोत्याचे असुन येथील सहकार सम्राट शोषित वंचित दुर्लक्षित घटकातील नेतृत्व जन्मालाच येऊ देत नाही चाळीस वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून बौद्ध समाजात देखील संतापाची लाट उसळली आहे.

जाहिरात

शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने येथे बौद्ध समाजाच्या उमेदवारांना जाणीवपुर्वक डावलले जात आहे.गेले नऊ -दहा वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल या भावनेतून राजेंद्र वाघमारे यांनी दोन-तीन वर्ष शिर्डी लोकसभा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम केले मात्र जागा वाटपाच्या वेळी त्यांना निराशा पत्करावी लागली.

जाहिरात

श्री वाघमारे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी सर्व बाजूंनी योग्य असतानाही आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे चांगलं वातावरण असूनही ही उमेदवारी काँग्रेसने न घेणे हा त्यांच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय आहे. असे मत यावेळी राजेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्व बौद्ध समाजाला कायम डावलत असुन फक्त नात्यागोत्यातील राजकारणाला महत्व देत आहे. काँग्रेसमध्ये बौद्ध समाजाचा निव्वळ वापर होत असुन माझ्या नंतरही काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले अनेक जण काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता देखील राजेंद्र वाघमारे यांनी वर्तविली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे