येवल्याचा आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा
येवल्याचा आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा
येवल्याचा आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा
येवला प्रतिनिधी दि २ मे २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्याचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला गुरुकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन अध्यक्ष हनुमंत भोंगळे, हेमंत शहा, कंकाली महाराज व प्राचार्य तुषार कापसे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन
करून प्रतिमा पूजन करत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी सांगितले की, संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास,संत एकनाथ संत व गाडगेबाबा अशा संतांच्या मांदिआळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला.अनेक समाज सुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.अशा सर्वांना वंदन करण्याचा हा दिवस आहे.आपण सर्वांनीच महाराष्ट्र गीतातून या महाराष्ट्राचे वर्णन ऐकलं आहे.दगड होईल तर सह्याद्रीचा, माती झालो तर महाराष्ट्राची आणि तलवार झालो तर आई भवानीची होईन.असे म्हणत सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हेमंत शहा यांनी देखील सर्वांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर प्राचार्य तुषार कापसे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता हेडगिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.