आपला जिल्हा

कोपरगांवात ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

कोपरगांवात ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
कोपरगांवात ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

कोपरगाव विजय कापसे दि ११ मे २०२४ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा  ब्राह्यण सभेच्या सभागृहात ब्राह्यण  सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर व त्यांच्या पत्नी सुनिता को-हाळकर, नंदकुमार जोशी व त्यांच्या पत्नी शिल्पा जोशी व  राजेश प्रजापती यांच्या शुभहस्ते  भगवान परशुरामांचे पुजन करत मोठ्या जल्लोषात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

जाहिरात

  कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव  सचिन महाजन यांनी केले.या कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न वैभव जोशी आणि सहकारी प्रमोद जोशी,मिलींद चौधरी,मिलींद जोशी यांनी केले तर या प्रसंगी उपस्थित  असलेले आमदार आशुतोष काळे यांचा शुभहस्ते भगवान परशुराम यांची पुजा व महाआरती करण्यात आली  या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या.ब्राह्यण समाजाला पुढील काळात भरपुर सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तर नंदकुमार जोशी यांनी कार्यालय बांधकामासाठी देणगी व  राजेश प्रजापती यांनी बांधकाम साहीत्य दिल्या बद्दल आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जाहिरात
या कार्यक्रमाला संजय सातभाई, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,  दत्तात्रय ठोंबरे, सुनिल गंगुले, कृष्णा आढाव, स्वप्निल निखाडे, मंदार पहाडे, विकी जोशी,सुनिल शिलेदार आदी सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर  कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद, बी.डी.कुलकर्णी, सहसचिव संदीप देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी, वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, डॉ मिलींद धारणगांवकर, वंदना चिकटे, श्रध्दा जवाद, योगेश कुलकर्णी ,सदाशिव धारणगांवकर, अजिंक्य पदे आदी पदाधिकारी समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अध्यक्ष  मकरंद को-हाळकर सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे तर आभार बांधकाम समितीचे अध्यक्ष तथा प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहार सरबत आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे