आपला जिल्हा
शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४९ टक्के मतदान
श्रीरामपूर मध्ये सर्वात कमी तर नेवासा मध्ये सर्वात जास्त
कोपरगाव विजय कापसे दि १३ मे २०२४– गेल्या महिन्यापासून संपूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज सोमवार दि १३ मे २०२४ रोजी होत असलेल्या चौथ्या टप्प्यात राखीव शिर्डी लोकसभा मतदार संघाकरिता मतदान प्रक्रिया संपन्न होत असून सहा मतदारसंघात ८ लाख ६४ हजार ५७६ पुरुष मतदार, ८ लाख १२ हजार ६८४ महिला तर ७८ तृतीयपंथी मतदार असे एकूण १६ लाख ७७ हजार ३३५ मतदार शिर्डी लोकसभा मतदारसंघात असून आज दुपारी १ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदार संघामध्ये ३०.४९ % टक्के मतदान झाले आहे.